बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राची आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी, एक पाऊल लॉकडाऊनच्या दिशेने!

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन सुरू करावा लागण्याची चिन्हं दिसत आहेत. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.

आज दिवसभरात राज्यात 49 हजार 447 करोनाबाधित वाढले असून, 277 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.88 टक्के आहे. राज्यात आजपर्यंत 55 हजार 655 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज एकूण 4 लाख 01 हजार 172 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना येणाऱ्या 2 दिवसात लाॅकडाऊन किंवा कडक निर्बँधांबाबत निर्णय घेऊ असं स्पष्ट केलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार महाराष्ट्रात लाॅकडाऊन करायला भाग पाडु नका असं सांगुनही आता लोक नियमांचं पालन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये अंशतः लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच, आज पुण्यात मिनी लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे, जो उद्यापासुन सुरू होऊन पुढचे 7 दिवस लागु असणार आहे. परंतु, आतातरी कोरोना आटोक्यात येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”

पुण्यात 6 ते 6 संचारबंदीचा पहिलाच दिवस अन् कोरोनाबाधितांचा आकडा काळजाचा थरकाप उडवणारा!

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण

‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक असताना; ‘या’ मैदानात खेळाडूंच्या आधी कोरोनाची ‘एन्ट्री’

सचिन वाझेंना दिलासा नाहीच; पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More