मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारत सरकारकडून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सर्वोच्च अशा कामगिरींसाठी जीवन रक्षक पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केलं.
महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून या आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे, अशा शब्दात अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.
राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱी-कर्मचारी, अग्शिशमन सेवा, कारागृह सेवा आणि नागरी क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवन रक्षक पदक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र म्हटले की, इतरांच्या रक्षणासाठी आघाडीवर राहणारा प्रदेश अशी ओळख आहे. ही महाराष्ट्राची दिमाखदार परंपरा पोलीस दलात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शूरवीरांसह,इतरांच्या बचावासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणारे आणि आगीसारख्या दुर्घटनेत सर्वात पुढे राहणाऱ्या बहाद्दरांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने उजळून टाकली आहे.”
थोडक्यात बातम्या-
आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यावर
शेतकरी जनसंवादादरम्यान सिंघू सीमेवर काँग्रेसच्या ‘या’ खासदारावर प्राणघातक हल्ला
सर्वांसाठी लोकल लवकरच होणार सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पद्मश्रीसाठी संजय राऊतांच्या नावाची ठाकरे सरकारने केली होती शिफारस
हेच का आपलं प्रजासत्ताक? केंद्र सरकारनं एक पाऊल मागं घेतलं असतं तर…