बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोळीबार सुरू असतानाही महाराष्ट्राची लेक नमली नाही; भारतीयांना मायदेशी सुखरूप आणलं

मुंबई | तालिबान्यांच्या आक्रमणामुळं अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडून जात आहेत. आज अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांनाही मायदेशी परत आणण्यात आलं. यासाठी भारतानं एक विमानही पाठवलं होतं. 129 भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाच विमान आज भारतात दाखल झालं. या विमानात हवाई सुंदरी म्हणून महाराष्ट्रातील श्वेता शंके काबूलला गेली होती.

श्वेता शंके हे मूळची अमरावतीच्या दर्यापूरमधली आहे. अतिशय भयावह परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेतलं आणि भारतीयांना घेऊन हे विमान पुन्हा भारतात दाखल झालं. श्वेताच्या या धाडसाबद्दल श्वेताचं सर्व स्थरातून कौतुक केलं जातंय.

श्वेता भारतात दाखल झाल्यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताला फोन केला आणि तिचं अभिनंदन केलं तसेच तिची विचारपूस केली. तिला कुठलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असा धीर दिला.

काबूल येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून जेव्हा इंडियन एअरलाइन्स विमान लँड झालं त्यावेळी फायरिंगचे आवाज येत असल्याचे श्वेता हिने सांगितलं. श्वेता अजूनही एअर क्राफ्टवर असल्याचं तिने पालकमंत्र्यांना सांगितलं आहे. अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान पोहोचलं असताना त्याला लँडिंग करू दिलं जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबूलच्या एअरपोर्ट उतरलं आणि भारतीयांना सुखरूप परत देखील घेऊन आलं.

थोडक्यात बातम्या- 

एअरलिफ्ट यशस्वी! अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची सुटका

धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर जाणा- उद्धव ठाकरे

“लवकरच मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधी होणार पुढील पंतप्रधान”

सारं जग झुकलं मात्र ‘हा’ पठ्ठ्या एकटा तालिबानपुढं उभा ठाकलाय, याचा गड अजूनही अभेद्य कसा?

शरद पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, आता संभाजी ब्रिगेड ‘ही’ भेट पाठवणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More