बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशान स्विकारलंय; मोदींनंतर ठाकरे हाच राष्ट्रीय ब्रँड”

मुंबई | आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता. दरवर्षीप्रमाणे वर्धापन दिन धुम-धडाक्यात साजरा न करता. साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्विकारलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यानंतर ठाकरे हा राष्ट्रीय ब्रँड असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय स्तररावर स्विकारण्यात आलं आहे. त्यामुळे मोदींनंतर देशाचं नेतृत्व कोण कराणार असा प्रश्न सगळ्यांना पडत असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

भारत देश हा लहान देश नसून, एक खंडप्राय देश आहे. त्यामुळे एक नाहीतर अनेक ताकदीचे नेते सोबत असतात. नेहरू आणि इंदिरा यांच्या काळातही 10 ताकदीचे नेते होते. त्यामुळे नवं नेतृत्व हे देशाला नेहमीच लाभत असतं. मोदी तर आहेतच पण आज देशात उद्धव ठाकरेही एक ताकदीचं नेतृत्व असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देश आज ज्या संकटातून जात आहे. ते पाहता देशाला संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज आहे. उद्धव ठाकरे राज्यात कोणतीही आदळाआपट न करता शांतपणे ज्या पद्धतीने काम करत आहेत. ते सगळा देश पाहत आहे. त्यामुळे मोदींनंतर कोणी नाही असं होत नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या- प्रविण दरेकर

30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

‘भाजपचं ओळखपत्रं दाखवा अन् मोफत पेट्रोल मिळवा’; शिवसेनेची खास ऑफर

“…तर हर हर महादेवचा गजर करत जिथल्या तिथे हिशेब चुकता करु”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More