बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्राची रूग्णवाढ देशासाठी गंभीर बाब’; मोदींनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली चिंता

मुंबई | गेल्या काही महिन्यात कोरोनाने थैमान घातलं होतं. त्यावेळी राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, आणि इतर औषधांचा राज्यात प्रचंड तुटवडा जाणवत होता. ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे पहिली ऑक्सिजन ट्रेन चालू केली होती. त्यानंतर आता रूग्णसंख्या कमी झाली आहे. पण येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच पाश्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने आतापर्यंत उचललेली ठोस पावले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची संपुर्ण माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. आज व्हिडीओ काँन्फरसिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक आयोजित केली होती.

ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे, अशी चिंता पंतप्रधान व्यक्त केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

दहावीचा निकाल अखेर जाहीर; कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत, भाजप हा ओबीसींचाच पक्ष – देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन!

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”

सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार?; उद्यानाच्या नामकरणावरून भाजप शिवसेना आमने-सामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More