बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मित्राच्या बहिणीसोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये’; लोकांना मोफत ऑक्सिजन देणारा अवलिया

मुंबई | मागील वर्षी कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोना सारख्या रोगाचा अचानक जगभरात प्रसार झाल्यानं संपुर्ण जग बंद झालं होतं. तर आरोग्य सुविधांवर सरकारला खर्च करावा लागला होता. आरोग्याच्या बाबतीत सुविधांची किती कमतरता आहे, हे सर्वांनाच जाणवू लागलं. त्यानंतर महाराष्ट्राने देखील चांगली आरोग्य सुविधा उभा केली होती. पण त्यानंतरही काहींचे प्राण गेले. असाच एक प्रकार घडल्यानं शहानवाज शेख नावाच्या तरूणाला धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनं सर्वाची मदत करण्याचं ठरवलं.

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहानवाज शेखच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शहनवाजला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचं ठरवलं. कोरोना ग्रस्त रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळावा यासाठी त्याची धडपड चालू झाली.

शहानवाजला ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यासाठी भांडवलाची गरज होती. शेवटी काही हाती न लागल्यानं त्यानं स्वतःची फोर्ड एंडेव्हर ही कार विकली. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांने 60 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तर आणखी 40 सिलिंडर भाड्याने घेतले. सद्यस्थितीत त्याच्याकडे आता 200 सिलेंडर आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच त्याने 4000 लोकांना मदत केली आहे. तर आता देखील तो मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करत आहे.

दरम्यान, सध्याची स्थिती पाहता त्यांने मलाड येथे वाॅर रूम तयार केलं आहे. तर त्याला दररोज 500 हून अधिक फोन येतात. तरी देखील आपण करत असलेली मदत अपुरी आहे, असं त्याला वाटतं. कोरोनाकाळातील त्यांच्या या कार्यमुळे अनेकांचे जीव वाचले आहे. त्याचं हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

थोडक्यात बातम्या-

“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

बाप, भाऊ, जावयानं मिळून केली तरुणीची हत्या; यवतमाळमधील घटनेनं महाराष्ट्र हादरला

‘मानवतेचा इतका पुळका असेल तर…’; सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा जो बायडन यांच्यावर हल्लाबोल

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले…

‘हा मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा डाव’; ‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओवर मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More