बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#TokyoOlympics | पोरगं महाराष्ट्राचं नाव काढणार!; तिरंदाजीत दमदार कामगिरी

टोकियो | कोरोना संकटानंतर अखेर टोकियो ऑलिम्पिकला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. भारतासाठी पहिला दिवस संमिश्र राहिला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या तिरंदाजीच्या सामन्यात भारतीय तिरंदाजांनी सुवर्ण पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पहिल्यांदाच मिश्र गटाचा सामना खेळत असलेल्या महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवनं तिरंदाजीत चांगली कामगिरी करत उपांत्य पुर्व फेरीत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधव आणि भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारी यांच्या जोडीनं चीनच्या संघाचा 5-3 असा पराभव केला आहे. तैवानच्या चिया एन लिन आणि चिह चून तांग यांच्याविरूद्ध दीपिका आणि प्रविण यांचा सामना खेळवला गेला. सुरवातीला भारताची सुरूवात खराब झाली. पहिला सेट तैवानच्या जोडीनं 36-35 अशा फरकानं जिंकला. त्यामुळे त्यांना दोन अंक मिळाले. त्यानंतर दीपिका आणि प्रविणने चांगला नेम धरला.

दुसरा सेट 38-38 च्या बरोबरीने सूटला. त्यानंतर दोन्ही संघाला 1-1 गुण मिळाले. त्यानंतर तैवानच्या जोडी 3-1 अशा फरकाने आघाडीवर होती. त्यानंतर सामना भारताच्या हातातून जाण्याची शक्यता होती. मात्र दीपिका आणि प्रविणनं खेळ पलटवला. या जोडीनं तिसरा सेट 40-35 च्या फरकानं जिंकत सामन्यात 3-3 अशी बरोबरी केली.

दरम्यान, शेवटच्या आणि चौथ्या सेटमध्ये कोण जिंकेल याची उत्सुकता लागली होती. भारतीय तिरंदाजांनी दमदार कामगिरी करत हा सेट 37-36 अशा अटीतटीच्या फरकाने जिंकला. त्याचबरोबर संघाला 2 गुण मिळाले आणि अखेर सामना 5-3 अशा फरकाने जिंकला. या विजयाबरोबरच आता दीपिका आणि प्रविणची जोडी उपांत्यपुर्व फेरीत पोहचली आहे. त्यांचा पुढील सामना दक्षिण कोरिया विरूद्ध बांग्लादेश यांच्यातल्या विजेच्या संघासोबत होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

चक दे इंडिया! टोकियो ऑलिम्पिकमध्ये रोमहर्षक लढतीत भारताची विजयी सलामी

पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

“…तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत”

लसीकरण केंद्रावर महिलांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

राजनाथ सिंह यांचा अजित पवारांना फोन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More