बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”

मुंबई | भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात काँग्रेस टुलकिट वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला होता. काँग्रेस कोरोनाच्या भारतीय स्ट्रेनचा उल्लेख मोदी स्ट्रेन म्हणून करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच शाब्दिक टीका झाली होती. हे प्रकरण ट्विटरपर्यंत गेलं होतं.

संबित पात्रा यांनी याच प्रकरणावर ट्विट केलं होतं. या ट्विटखाली ट्विटरकडून ‘मॅनिपुलेटेड मीडिया’ असं लिहिण्यात आलं होतं. एखादी माहिती, फोटो, व्हिडीओ किंवा पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत असेल आणि त्याला योग्य प्रकारे साभार देण्यात आला नाही तर, ट्विट त्याला मॅनिपुलेटेड मीडिया असा टॅग देतात. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणात ट्विटरला नोटीस दिली होती.

ट्विटरला नोटीस दिल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर आक्रमकपणे टीका केली आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपची खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली!’, असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.

दरम्यान, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांचं उत्तर अस्पष्ट असल्यानं आम्हाला इथं यावं लागलं असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. यापूर्वी देखील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ट्विटर कंपनीला नोटीस पाठवली होती आणि मॅनिपुलेटेड मीडियाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सावधान! कोरोनानंतर लहान मुलांना ‘या’ आजाराचा धोका

पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट, परंतू मृतांच्या संख्येत वाढ

“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”

अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, गाड्यांची तोडफोड; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More