बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 536 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 853 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 21 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 7 हजार 854 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 34 हजार 980 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 82 हजार 493 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 962 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Death) झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 54 लाख 20 हजार 117 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा”, मनसेची मागणी

“कोलांटीउड्याच्या स्पर्धेत माकडही मागं पडतील, अधिवेशन आलं की यांची तब्येत बिघडते”

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

राज्यातील निर्बंध वाढवणार का?, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More