बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावी बारावी परिक्षांचं वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

मुंबई | कोरोनाच्या काळात सर्वांना घरी रहावं लागलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर आता राज्यातील काही भागात शाळा आणि महाविद्यालये काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत. अशातच आता राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं जाहीर केलं आहे. बारावीच्या परीक्षा या 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान होणार आहेत. तर 15 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान दहावीच्या परीक्षा होणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लेखी आणि तोंडी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राज्यात ओमिक्राॅनचा धोका वाढतोय. दहावी आणि बारावीचं वर्ष महत्त्वाचं असल्यानं आता आम्ही ओमिक्राॅनबाबत माॅनिटरिंग करत आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

पाहा संपूर्ण वेळापत्रक –  https://www.mahahsscboard.in/

थोडक्यात बातम्या-

“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिसाहात नोंद होईल”

गडकरी म्हणतात,”लखीमपूर घटना म्हणजे केवळ अपघात, राजीनामा मागणं चुकीचं”

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला जोरदार झटका; मतदानाच्या दिवशीच बाप-लेकाला अटक

iphone 13 सिरीजवर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ही बंपर ऑफर

ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More