बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत’; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

नवी दिल्ली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दोऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे 12 खासदार देखील होते.

राहुल शेवाळे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांच्या नावाचा उल्लेख करत महाराष्ट्रातील 50 आमदारांनी भाजपसोबत जाण्याची जी भूमिका घेतली तीच भूमिका या बारा खासदारांनी घेतली आहे, असं  एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. जनतेने निवडणुकीपूर्वी अडीच वर्षांपूर्वी जी युती होती त्याचे स्वागत केले आहे. लोकांसाठी जे चागले काम करता येईल, असं लोकांचं सरकार असावं, अशी आमची भूमिका आहे, असं ते म्हणालेत. तसेच सेनाप्रमुखांच्या विचारावर चालणारे म्हणूनच हे बारा खासदार माझ्याकडे आलेत, असंही शिंदे म्हणालेत.

संजय राऊत यांचा मॅटिनी शो बंद झाला, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. शिंदे गटाच्या नेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड होणे आणि भावना गवळी यांना प्रतोदपदी नेमणे याबाब कायदेशीर कारवायांमुळे झाल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यानंतर शिंदे यांनी असे कोण म्हणते, असा प्रतिसवाल केला.

पत्रकारांनी संजय राऊत यांचे नाव घेतलं. त्यावर ज्या लोकांचे नाव तुम्ही घेतले त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायचे गरज नाही, असे म्हणत शिंदे यांनी संजय राऊत हे रोज सकाळी येऊन काहीतरी बोलत होते. आता त्यांचा तो मॅटिनी शो बंद झाला आहे. पण तुम्हाला बातम्या हव्या असतात त्यामुळे तुम्ही राऊत यांच्या विधानांना महत्व देता, असंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यामागचं सांगितलं कारण, म्हणाले… 

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

“माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा”

“बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं”

“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More