महाराष्ट्र मुंबई शिक्षण

राज्यातील शाळा ‘या’ अ‌ॅपवर भरणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या परिस्थितीत सध्या महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारनं आता कौतुकास्पद पाऊल टाकलं आहे. राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून या उपक्रमासाठी सरकारनं गुगलशी करारही केला आहे.

या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, गुगलचे भारतातील विक्री प्रमुख संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना आता कोणत्याही ठिकाणावरून शिक्षण घेणं सुलभ होणार आहे.

विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच शिक्षकांना या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेणं तसेच प्रकल्प देऊन त्यांचे मुल्यमापन करणंही या प्रकल्पामुळे सुलभ होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे.

दरम्यान सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचं आमचे लक्ष्य आहे, असं मत वर्षा गायकवाड यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या माजी राज्यपालांवर सोपवली मोठी जबाबदारी

पुण्यात कोरोनाची लाट ओसरण्याची शक्यता; ‘ही’ आकडेवारी दिलासा देणारी

मनमाड हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांची गळा चिरून हत्या; 4 वर्षांच्या चिमुरडीला….

सेलिब्रेटींच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच; आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केली आत्महत्या

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई; ‘या’ 6 जणांविरोधात FIR दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या