तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Mahashaskti Candidate l विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यामुळे सर्वच पक्षातील उमेदवारणाची यादी जाहीर करण्याचे काम सुरु आहे. काल भाजपने 99 उमेदवारांची उड़ी देखील जाहीर केली आहे. तर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत.

Mahashaskti Candidate l परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार! :

याशिवाय स्वाभिमानी पक्षाच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान परिवर्तन महाशक्तीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं देखील नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अचलपूर – बच्चू कडू – प्रहार
रावेर – अनिल चौधरी – प्रहार
ऐरोली – अंकुश कदम- महाराष्ट्र स्वराज पक्ष
हदगाव हिमायतनगर – माधव देवसरकर – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
चांदवड – गणेश निंबाळकर – प्रहार
देगलूर – सुभाष सामने – प्रहार
हिंगोली – गोविंदराव भवर – महाराष्ट्र राज्य समिती
राजुरा – वामनराव चटप – स्वतंत्र भारत पक्ष

News Title : Today Release Mahashaskti Candidate List

महत्वाच्या बातम्या –

अजितदादा गटाची यादी थोड्याच वेळात जाहीर; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

लाडकी बहीण योजना बंद? आदिती तटकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

बीडमध्ये मोठी उलथापालथ; पंकजा मुंडेंना धक्का

भाजपमध्ये बंडखोरीला सुरवात? ‘या’ नेत्याची सागर बंगल्यावर धाव

उमेदवारी न मिळाल्याने नगरमध्ये नाराजी नाट्य; भाजपचा बडा नेता बंडाच्या तयारीत?