बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत प्रत्येक नागरिकावर मोफत उपचार

मुंबई  | राज्यातील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या लक्षात घेता शनिवारी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील सर्व नागरिकांना सरसकट महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत मोफत उपचार होतील.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुंबईतील खासगी रुग्णालयात 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नागरिकांना सरकारी रुग्णालयाच्या खर्चातच खासगी रुग्णालयात उपचार मिळतील.

यापूर्वी राज्यातील 85 टक्के लोक महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत येत होते. परंतू, आता सरकारने पांढरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील नागरिकांनाही या योजनेत सामावून घेतले आहे.

आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास खाटा कमी पडू नयेत व बिगरकोरोना रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. ही योजना 31 जुलै 2020 पर्यंत अंमलात राहील. त्यानंतर परिस्थिती पाहून मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असं शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“राज्य सरकारला विरोध केला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही, मग केंद्राला विरोध करणारे देशद्रोही का?”

‘विश्वासाची वर्षपूर्ती’ म्हणत अमोल कोल्हेंनी सादर केलं एका वर्षाचं रिपोर्टकार्ड

महत्वाच्या बातम्या-

PMPML च्या 2100 कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचा पगार नाही

हे जर असंच सुरू राहिलं तर कामगार कपातीप्रमाणे मंत्रीकपात करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल- संजय राऊत

“…तर मग सगळ्यात अपयशी गुजरात आणि उ.प्रदेश राज्य, अन् त्यांची जबाबदारी मोदी आणि शहांची असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More