बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील सर्व जनतेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ, असा निर्णय घेणारं देशातील एकमेव राज्य

मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने युध्द पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील सर्व जनतेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालये कोविड-19 रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड-19 रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये, कोविड-19 महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी आणि आर्थिक दिलासा मिळावा यासाठी मर्यादित कालावधीसाठी योजनेची व्याप्ती सर्व नागरिकांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून प्राप्त झाला.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील उपचाराचा लाभ लाभार्थी रुग्णांबरोबर इतर रुग्णानांदेखील मिळावा आणि शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या उपचार पध्दती उपलब्ध व्हाव्यात व योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयातील डॉक्टर, इतर कर्मचारी व अनुषंगिक कर्मचारी यांना कोविड-19 साथरोग प्रतिबंध संदर्भात आवश्यक साधन सामग्री उपलब्ध व्हावी. यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड-19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपाचार करण्याकरिता लाभार्थी रुग्णांबरोबर राज्यातील सदर योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये कोविड-19 साठी उपचार मिळणार आहेत.

राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहित कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करावी. (लाभार्थ्यांला रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसिलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक पुरावाजन्य कागदपत्र सादर करावे लागेल).

ट्रेंडिंग बातम्या-

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“इतकं वाटत असेल तर स्वत: येऊन परिस्थिती सांभाळा”

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या संकटकाळात राज्यपाल कोश्यारींनी घेतला मोठा निर्णय

जर मला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर…; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More