…म्हणून आमदारांनी थेट महात्मा गांधींना मास्क लावला!

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात एका आमदारांनी चक्क महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

आपचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आणि भाजप आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी हा प्रकार केलाय. या दोन्ही नेत्यांना चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

बिफोर केजरीवाल आणि अफ्टर केजरीवाल अशा आशयाचं ट्विट करत गांधींचा मास्क न घातलेला आणि मास्क घातलेला असे दोन फोटो कपिल मिश्रा यांनी ट्विटरवही पोस्ट केलेत.