बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधींच्या पणतीला न्यायालयानं ‘या’ गुन्ह्यांतर्गत सुनावली 7 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली |  दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या महात्मा गांधींच्या पणतीला फसवणूकीच्या गुन्हा अंतर्गत तुरूंगवासात पाठवण्यात आलं आहे. 56 वर्षांच्या आशिष लता रामगोबिन यांना 60 लाख रुपयांची फसवणूक आणि धोका दिल्याप्रकरणी डर्बन न्यायालयानं 7 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायालयानं निकाल दिला ज्यामध्ये आशिष लता रामगोबिन यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

स्वत:ला व्यावसायिक सांगत लताने स्थानिक व्यावसायिकाकडून 62 लाख रुपये हडपले. फसवणूक झालेल्या एसआर महाराजांनी सांगितलं की, लता यांनी नफ्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. उद्योजक एसआर महाराज यांच्या फसवणूकीचा आरोप लता यांच्यावर झाला होता. महाराजांनी लताला माल आयात करण्यासाठी आणि सीमाशुल्क देण्यासाठी 60 लाख रुपये दिले होते. लता यांनी आश्वासन दिलं होतं की, या नफ्यातील काही भाग त्या एसआर महाराजांना देणार.

महाराज यांची कंपनी लिननचे कपडे आणि चपलांची आयात, निर्मिती आणि विक्री करते. त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रॉफीट शेअरच्या आधारावर पैसेही देते. लता रामगोबिन यांनी महाराजांना सांगितलं की, त्यांनी दक्षिण अफ्रिकी रुग्णालय ग्रुपसाठी लिननच्या कपड्यांचे 3 कंटेनर आयात केले आहेत. तिनं यासाठीच्या सीमाशुल्कासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगत स्वतःची सही असलेला खरेदीच्या ऑर्डरचा पुरावा पाठवला आणि महाराजकडून 62 लाख रुपये घेतले. मात्र, महाराजांना नंतर समजलं की, ही कागदपत्रे बनावट आहेत. त्यानंतर त्यांनी लगेचच लता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान, प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची मुलगी लता रामगोबिन यांना डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टानं आरोप सिद्ध झाल्यावर अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आलं की, लता रामगोबिन यांनी ऑगस्ट 2015 मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक महाराज यांची भेट घेतली होती.

थोडक्यात बातम्या –

कबीर सिंगच्या प्रितीचा हाॅट अंडरवाॅटर व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

आरोग्य विभागात मेगा भरती; 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी

‘या’ देशांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

बाबो! 37व्या वेळी विवाहबंधनात 28 बायका, 135 मुलं, 126 नातवंडांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; पाहा व्हिडीओ

कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न देणाऱ्या लॅबचे परवाने होणार रद्द?; कारणे दाखवा नोटीशीनंतरही उत्तर नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More