बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य!

औरंगाबाद | भाजप(BJP) आणि शिवसेना(Shivsena) यांची युती संपुष्टात आल्यानंतर महाराष्ट्रात 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं होतं. त्यातच महाराष्ट्रात गेल्या महिन्यात झालेला सत्ता संघर्षाने महाविकास आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. पण सध्या ही महाविकास आघाडीही तुटण्याच्या चर्चा रंगल्या आहेत, कारण काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी महाविकास आघाडीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडी नैसर्गिक युती नाही, ना कोणतीही पर्मनंट नाही, विपरीत परिस्थितीत एकत्र आलेले पक्ष आहेत, असे नाना पटोले औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडी कोसळणार का?, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर देखील टीका केली.

पहाटेच सरकार पडलं आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते. त्यावेळी आम्ही सरकारमध्ये नव्हतो. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता. त्यांनी आम्हाला साधं विचारलही नाही, अशी नाराजी त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केली.

दरम्यान, विधानपरिषदेपदी विरोधीपक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आलीये. हा निर्णय शिवसेनेने परस्पर कोणतीही चर्चा न घेता केल्याने नाना पटोले नाराज असल्याचं दिसून आलं आहे. यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

ईडीच्या रडारवर असलेल्या भानवा गवळींनी बांधली मोदींना राखी

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा, म्हणाले…

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More