Top News महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?

मुंबई | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार बनवलं खरं, मात्र त्यांच्यातील कुरबुरी काही कमी होताना दिसत नाहीत. आता विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं या पदाच्या निवडीबाबत महाविकास आघाडीत पुन्हा चर्चेच्या फेऱ्या रंगणार असल्याचं दिसतंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसच्या या टायमिंगवर नाराज असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी दिल्लीत या मुद्द्यावर बोलताना हे पद कुणाकडे जाईल यावर भाष्य केलं होतं.

पद रिक्त झालं आहे. आता बघू चर्चेनंतर ठरवू. सगळेच पक्ष त्याच्यावर चर्चा करु शकतात, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं, आता ते रिक्त झालं आहे, या शरद पवार यांच्या वक्तव्याकडे देखील गांभीर्यानं पाहिलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला ‘हा’ गंभीर आरोेप!-

“प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील”

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा!

शरजील उस्मानीच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर उर्मिला मातोंडकरांचं रोखठोक मत, म्हणाल्या…

‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’; भाजपच्या या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या