बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं”

मुंबई | कोरोना महामारीमुळे मुंबई शहरासह उपनगरांमध्ये देखील अनेक निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने हळूहळू निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईतील लोकलचे दरवाजे देखील बंद आहेत. सध्या जरी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी देखील सरकारने खबरदारी म्हणून अद्याप मुंबई लोकल सुरु केली नाही.

मुंबई लोकलमधील प्रवासाच्या मुद्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आलेले दिसत आहे. लोकलच्या प्रवासावरुन भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्यनंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांना प्रतिउत्तर दिलं आहे. सामान्य मुंबईकरांना छळण्यात महाविकास आघाडी सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

सचिन सावंत यांचं ट्वीट रिट्वीट करत उपाध्ये म्हणाले की, धन्यवाद, तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा आनंद मिळतो, हे दिसलं. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडं पडलं. लोकल प्रवासावरुन हायकोर्टाने थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही.

तसेच लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलन झाले की मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. शेवटी आंदोलन हे होईलच, असा स्पष्ट इशारा केशव उपाध्ये यांंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 11 वर्षांची नताशा ठरली जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

… अन्यथा आंदोलन करण्यात येईल, एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक!

माझ्या व्यवसायावर लाथ मारू नकोस- गुलशन ग्रोवर

भररस्त्यात तरुणीचा हायहोल्टेज ड्रामा! गाडी चालकाच्या कानाखाली लगावत…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More