“मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजीराजे यांचं उपोषण सोडवावं”
मुंबई | खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यासाठी आझाद मैदानात आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. राज्यातील अनेक भागातून या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजेंच्या उपोषणास पाठिंबा दर्शवत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने मराठा बांधवाच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्ष या लढ्यात मराठा बांधवांसोबत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना संभाजीराजेंचं उपोषण सोडण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी माझा लढा गरिब मराठ्यांसाठी असल्याचं म्हटलं आहे. संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही छत्रपती संभाजीराजेंनी दिला आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी संस्था या काही मागण्यासाठी संभाजीराजे आमरण उपोषण करत आहेत.
दरम्यान, युवराज संभाजीराजे यांची खासगी वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली आहे. उपोषणस्थळी महाराष्ट्रातून हजारो समाज बांधव आले आहेत. स्वतः अन्नत्याग केला असला तरी, पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बाधंवांच्या जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीराजेंनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ, राज्यपाल कोश्यारींनी दिले ‘हे’ आदेश
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
“शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, मग राष्ट्रवादीच्या का नाही?”
“मला धमकी आली तर…”, खासदार संभाजीराजेंचा थेट इशारा
शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.