बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचं ठरलंय! महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर करायची”

पुणे | राज्यात मागील काही महिन्यांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झटका देत राज्यातील ओबीसी आरक्षणामुळं निवडणुका पुढं ढकलता येणार नाहीत, असा निकाल दिला होता. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी आरक्षणावरून टीका केली आहे.

आमची भूमिका स्पष्ट आहे. आता आमचं ठरलं आहे की, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा रिक्षा पंक्चर करायचीय, असा इशारा बावनकुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे. बावनकुळे पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर 25 लाख युवांनी संकल्प यात्रा काढून जोडण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. 25 डिसेंबर हा अटलजींचा वाढदिवस आहे. आम्ही हे संपर्क अभियान पुर्ण करणार आहोत, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आहे. भाजपला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. न्यायालयाने सांगूनही सरकारने डेटा तयार केला नाही. हा सेन्सस डेटा आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नसून, अन्याय करायचा आहे, अशी टीका बावनकुळेंनी राज्यातील महाविकास आघाडी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

“प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, ते फक्त भाजप आणि आरएसएसचे नाहीत”

‘मोदींजीना बोलवा, तरच मी लस घेईल’; पठ्ठ्याच्या मागणीनं अधिकाऱ्यांना फुटला घाम

“मोदीजी म्हणतील, मैं संजय राऊत के सामने रहता हूँ”

”उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

मी स्वतःला भाग्यवान समजतो…, शिक्षण क्षेत्रात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे काम उल्लेखनीय – चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More