“…त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पडणार, दिवा विझण्यापुर्वी फडफडतो”
मुंबई | राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. महाविकास आघाडी सरकार अंतर्गत वादाने कोसळेल, असा दावा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असं वक्तव्य केलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सात मार्चला मतदान झालं की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. कोठड्या तयार आहेत, असा इशाराही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. त्यातून पळता भूई थोडी होईल आणि हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे, त्यातून सामान्य माणूसही असा अंदाज बांधू शकतो, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दिशा सालियनच्या हत्येवरून चंद्रकांत पाटील यांनी इशारा दिला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतलं आहे आणि कोण तुरुंगात जाणार हेही स्पष्ट होईल. त्यामुळेच सध्या उसणे अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापुर्वी फडफडतो तसा तो प्रकार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
सुप्रिया सुळेंना सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, 11 पैकी 4 महाराष्ट्राचे खासदार
आर्यन खानची लवकरच होणार बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; अॅक्टींग नाही तर ‘हे’ काम करणार
“…तर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”
“शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, महाराष्ट्राच्या भल्यासाठी…”
दिशाच्या आई-वडिलांनी मौन सोडलं, दिशाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर
Comments are closed.