मुंबई | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार कधी पाडणार हे आता भाजप सांगणार नाही, आम्ही थेट कृती करणार, असं दरेकर म्हणालेत.
प्रवीण दरेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, “सरकार पडेल या विषयावर बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. म्हणून आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील हे सांगणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “सरकार पाडण्याबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ. त्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांनीही सरकार बदलासंदर्भात बोलणं बंद केलं तर चांगलं होईल.”
शिवाय जरी महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी त्यांच्यात अंतर्गत संघर्ष आहेत. पक्षांतर्गत कुरघोड्या असून सरकार पूर्ण विसंवादाने भरलेलं, असल्याचंही दरेकर म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
‘राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण…’; शरद पवार
मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार- राम कदम
“भाजपने पराभवातून धडा घ्यायला हवा, देशात आता ईडी आणि सीबीआयचं राजकारण चालणार नाही”
‘कंगणा राणावत म्हणजे हिमाचलाचं सडलेलं सफरचंद’; या खासदाराची कंगणावर टीक
“विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार”
मेरे सैय्या सुपरस्टार; लग्नमंडपात नवरीनं केलेल्या डान्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Comments are closed.