बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरूष, बाबरी तोडली तेव्हा काखा वर करून पळालो नाही”

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून सतत सरकार पाडण्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या या दाव्याला आणि आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत सतत भाजपवर टीका करताना दिसत आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करून सरकार पडत असेल तर आर्मीला बोलवा, असं आवाहन संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

डोमकावळे कितीही फडफडले तरी त्यांना काही महाविकास आघाडी सरकार पाडण्याची सुपारी फोडता येणार नाही. मी माझ्या पक्षासाठी कोणतेही घाव झेलण्यास तयार आहे. महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी खूप खटपटी आणि लटपटी केल्या आहेत, त्यामुळं आम्हाला यश आलं असं राऊत म्हणाले आहेत.

पुलोद नंतर महाराष्ट्रात असा पहिल्यादांच प्रयोग घडला आहे. पुलोदचे शिल्पकार शरद पवार आपल्यासोबत आहेत. शरद पवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भक्कम पाठिंबा आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर, त्यांनी आर्मीला बोलवा असा खोचक टोला संजय राऊत भाजपला लगावला आहे.

दरम्यान, आम्ही हिंदूत्वाचे पुराणपुरूष आहेत. मूळ पुरूष आहोत आम्हाला कसं काय कोणी शिकवून चालेल. बाबरी तोडली तेव्हा काखा वर करून पळालो नाहीत. तुम्हीच पळून गेला होतात. काश्मीर खोऱ्यात जिथं हिंदूंचं हत्याकांड सुरू आहे. बांग्लादेशात जे हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत. त्यांची घरं जाळली जात आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. त्यांना संरक्षण देण्याबाबत सामनामध्ये आज अग्रलेख लिहीत राऊतांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्र तुळशीचे वृंदावन आहे, इथं गांज्या आणि भांग पिकवू नका”

“एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय”

‘आज गोपीनाथराव असते तर त्यांनी…’; छगन भुजबळांनी दिला आठवणींना उजाळा

‘बाळासाहेब थोरातांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी…’; विखे पाटलांचं थोरातांना आव्हान

भारताविरूद्ध पाकिस्तानचे ‘हे’ 11 खेळाडू मैदानात उतरणार; पाकिस्तानचा संघ जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More