बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडी सरकारचा छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा दणका

सातारा | महाविकास आघाडीने भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे यांना मोठा धक्का दिला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील  खेड-शिवापूर तसेच सातारा-कोल्हापूर महामार्गावरील आणेवाडी या दोन टोल नाक्यांचं कंत्राट हे उदयनराजे यांचे समर्थक असलेल्या अशोक स्थापत्य कंपनीकडे होतं. मात्र आता हे कंत्राट त्यांच्याकडून काढून घेऊन पुण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलं आहे.

आणेवाडी टोलणाक्याचं कंत्राट आपल्याकडे राहवं यासाठी भाजप आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांच्या समर्थक नगरसेवकांनी जोर लावला होता. या कारणामुळे बरंच राजकारण घडलं असून शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र आता हे कंत्राट पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके आणि शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पुण्यातील खेड-शिवापूर आणि साताऱ्यातील आणेवाडी हे दोन टोल नाके सध्या अशोक स्थापत्य कंपनीकडे आहेत. मात्र ३ एप्रिल पासून या दोन्ही टोल नाक्यांचे व्यवस्थापन बदलण्यात येणार आहे. या कारणामुळे या दोन्ही टोलनाक्यांवरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील खेड-शिवापूर आणि साताऱ्यातील आणेवाडी या दोन्ही टोलनाक्यांचे कंत्राट उदयनराजे यांच्याकडून काढून घेण्यात आल्यामुळे छत्रपती उदयनराजे यांना मोठा धक्का बसला असल्याचं म्हटलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

2 दिवसांत चक्क 4 टन आंब्याची आगाऊ नोंदणी; शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी लढवली ‘ही’ शक्कल

मन हदरवून टाकणारी घटना, एकाच वेळी कुटुंबातील सगळ्यांचे मृतदेह सापडले एकाच घरात

अनुष्का शर्माच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे शुटींगवर परतल्यानंतर ती होतेय ट्रोल

राजेश टोपे यांचं महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य; वाचा सविस्तर

निवडणुकीच्या प्रचारात भाजपने केली ‘ही’ घोडचूक; चूक समजताच व्हिडीओ हटवला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More