मुंबई | राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आजा भल्या पहाटे ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. ईडीने नवाब मलिक यांची चौकशी सुरू केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आता नवाब मलिकांच्या मालमत्तेवरून त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत त्यांनी एका कवितेच्या माध्यमातून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, तुम्हाला राष्ट्रवादीचा गडी पुरून उरणार, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. स्टॅण्ड विथ नवाब मलिक, असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे.
वाचा अमोल कोल्हे यांची कविता-
सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा…
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी
थोडक्यात बातम्या-
“पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यांना आम्ही काय सांगणार?”
मोठी बातमी! अखेर 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक
“नवाब मलिकांची राज्य मंत्रिमंडळातून हकलपट्टी करायला लावणार”
“वुहानच्या ज्या प्रयोगशाळेत कोरोना सापडला त्याचा मालक बिल गेट्स”
“नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका”
Comments are closed.