ठाकरे-आंबेडकर युतीबाबत अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आज मविआची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) उपस्थित होते.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करत असताना महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या वेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जे जे पक्ष आहेत त्या त्या प्रमुख पक्षांनी आपल्या मित्र पक्षाला सांभाळणं गरजेचं आहे.

पुढं जागा वाटप बद्दल सुद्धा त्यांनी आपलं मत मांडलं. आपल्या मित्रपक्षासाठी आपण किती जागा देणार आणि कोणती जागा लढवली जाणार या बद्दल सुद्धा ज्या त्या पक्ष प्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं देखील ते म्हणाले.

तर शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काॅंग्रेसची भूमिका सांगणार आहेत. मात्र आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची आमची मानसिकता झाली आहे, असं अजित पवार म्हणाले.

त्यामुळं आज पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांनी आपला पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ राज्यात कंडोम झालं बॅन!

‘त्या’ गाण्यामुळं रॅपर बादशाहाला नागपूर न्यायालयाची नोटीस

लेक अथियापेक्षाही भन्नाट आहे सुनील शेट्टीची लव्हस्टोरी!

मोठी बातमी! ‘या’ राज्यांना भूकंपाचे झटके

‘मला तुरुंगात…’, मविआबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट