बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न”

मुंबई | एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावरून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून मागवला असता अहवाल गायब झाल्याचं उत्तर अजित पवारांना मिळालं होतं. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यावरून आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आमचं सरकार असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की, यांनीच जाणीवपूर्वक अहवाल गायब केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यातील लोकांनी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसं वातावरण देखील सध्या निर्माण झालं आहे, असं ते म्हणाले.

संजय राठोड यांच्यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नावरून देखील दरेकरांनी सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारला लाज राहिली नाही. ते जरी संजय राठोडला आणायचा प्रयत्न करत असले तरी जनता मूर्ख नाही, असं दरेकर म्हणाले. पक्षीय भेदाभेद होऊ शकत नाही. आपला कायदा सर्वांना समान आहे. कारखान्याच्या संदर्भात जी काही चौकशी होत आहे ती संस्था म्हणून होत आहे, असं भाष्य त्यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर केलंय.

नानांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे. नाना पटोले यांच्या भावना खऱ्या आहेत. त्यांनी तलवार म्यान केली आहे. भावना तर त्यांनी प्रकट केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे दिसत आहे. जे एकमेकांवर विश्वास ठेवू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय विश्वास देणार? अशी खोचक टीका देखील प्रविण दरेकर यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

महाविकास आघाडीतील वाद शरद पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

“नानांच्या बोलण्यानं राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?”

“इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा ही कुठे होती ?”

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More