Pune News l कित्येक दिवसांपासून पुणेकर शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोची वाट पाहत आहेत. या मेट्रोचं पूर्णपणे काम होऊनही अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. कारण शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोचे उद्घाटन काल (26 सप्टें) ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र पुणे शहरात मुसळधार पाऊस झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा काल रद्द करण्यात आला. त्यामुळे पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन आता राज्य सरकारने पुढे ढकलले आहे. मात्र आता यावरून पुण्याच राजकारण प्रचंड तापलं आहे.
मेट्रो उदघाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील नागरिक शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला असून या मेट्रोचं उदघाटन देखील पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र आता पुणेकरांना या मेट्रोची अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय आता महाविकास आघाडीच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांनी या मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा देखील दिला आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे पुण्यातील स्थानिक नेते हे एकत्र येऊन शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोमार्गाचे उद्घाटन करणार असल्याचं देखील पुण्यातील स्थानिक नेत्यांनी म्हटलं आहे.
Pune News l पोलीस बंदोबस्त तैनात :
शिवाजीनगर ते स्वारगेट ही मेट्रो येत्या 24 तासांत सुरु करण्याची मागणी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मात्र, येत्या 24 तासांत हा मेट्रोमार्ग सुरू न केल्यास महाविकास आघाडी आंदोलनाच्या तयारीत असल्याचं देखील सरकारला सांगण्यात आलं आहे.
अशातच आता येत्या 29 सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोचे दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पुणे शहरातील या मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यानंतर आता माविआच्या नेत्यांनी या मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिल्यामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पुण्यातील राजकारण तापलं आहे.
News Title – Mahavikas aghadi leaders warn of inauguration of pune metro
महत्त्वाच्या बातम्या-
‘बदला पुरा’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांचं रोखठोक भाष्य!
धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार
‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका
भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?