“महाराष्ट्राला धक्का बसतील असे महाविकास आघाडीतील लोक भाजमध्ये येणार आहेत”

मुंबई | शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. ठाकरेंकडील अनेक विश्वासू आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटात गेले. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी(Chandrashekhar Bawankule) महाविकास आघाडीतील आणखी काही नेते भाजप(BJP) व शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

येत्या काही दिवसांत भाजमध्ये काही मोठे नेते येणार आहेत. महाविकास आघाडीतील पक्ष रिकामे होतील. शिवसेनेमधील अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) संपर्कात आहेत, तर काही भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

येणाऱ्या काळात प्रवेशाबाबत बाॅम्बस्फोट होतील. संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसतील अशी नावे आहेत. हे लोक भाजमध्ये येणार आहेत. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, असं म्हणत बावनकुळेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

तसेच विधान परिषद निवडणुकीवरून शिंदे गट नाराज असल्याचा सवाल नाही. कारण मी रोज एकनाथ शिंदे यांना बोलतो. संगळ्याशी बोलूनच उमेदवार अंतिम होतील, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतचं धूसफूस सुरू आहे, असा दावा केला आहे.

दरम्यान, त्यांच्या लोकांना घेऊन नाना पटोले नागपूरात बसले आहेत. तेच भांडत आहे. आमच्यात सर्व काही ठिक आहे, असंही बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-