बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीतील मंत्रीच सरकारवर संतप्त, दिला आंदोलनाचा इशारा!

मुंबई | राज्य शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणाऱ्या जीआरविरुद्ध आंदोलनाची तयारी सुरू झाली असताना या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी संबंधित मंत्र्यांची बैठक बोलविली आहे. काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या सेलची शुक्रवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन सरकारच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.

आपण सरकारमध्ये आहोत पण मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आता सरकारविरुद्ध आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असं राऊत म्हणाले. अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी आणि विशेष मागास वर्गांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणासाठी 33 टक्के जागा राखीव ठेवून अन्य पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय सरकारने गेल्या महिन्यात घेतला. मात्र, 7 मे रोजी एक शासन आदेश काढून 100 टक्के पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

राऊत यांनी या संदर्भात घेतलेल्या बैठकीला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव संपतकुमार, अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्रचे प्रभारी मनोज बागडी, भाई नगराळे, विजय आंभोरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, सर्वांनी आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. पदोन्नतीतील आरक्षण हटविण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाची दलितांमध्ये असलेली प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांचा खटाटोप सुरू आहे, असा आरोप मुणगेकर यांनी यावेळी केला.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनामुळे घरातील व्यक्तीचा मृत्यू, समाजकंटकांनी शेतातील कांदा केला नष्ट

“2022 मध्ये मोदी राष्ट्रपती बनतील, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावून ते स्वत: सरकार चालवतील”

अरबी समुद्रातील वादळाचं रौद्ररुप, पुण्यावर काय परिणाम होणार?

काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव काळाच्या पडद्याआड; कोरोनाशी झुंज अपयशी

अदर यांच्यानंतर आता वडील सायरस पुनावालाही लंडनला रवाना, नव्या चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More