मुंबई | औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण, या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, औरंगाबादच्या नामकरणावरुन आता चांगलंच राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय.
थोडक्यात बातम्या-
कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर
कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी
‘कोरोना लसीमुळे तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
‘…नाही तर मी राजीनामा देईल’; सुजय विखे पाटील भडकले
‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाही तर…’; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी