‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण

Hording Collaps Video

Mahavikas Aghadi Vs BJP | अवकाळी पावसाने मुंबईकरांवर काळाचा घाला घातला. घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपवर भलं मोठं होर्डिंग पडल्याने पेट्रेलपंपाखाली काही लोकं अडकली गेली. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले तर काहींना त्यातून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला. तसेच 100 लोकं या पेट्रोल पंपाखाली अडकले होते. अडकलेल्या 74 जणांना बाहेर काढण्यात आलं. काही जखमींवर राजावडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्याच अवकाळी पावसाने मुंबईमध्ये मोठं नुकसान झालं. एक मोठी दुर्घटना घडली. निष्पाप नागरिकांचे प्राण गमावले गेले. या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

होर्डिंग दुर्घटनेला राजकीय रंग

अशा स्थितीत बचाव पथक काम करताना दिसत होते. मात्र यावेळी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांच्यात बाचाबाची होताना दिसली आहे. या होर्डिंग दुर्घटनेला आता राजकीय रंग लागला आहे. भाजपा नेते किरीट सोम्मय्या, मिहिर कोटेचा आणि पराग शहा घटनास्थळी होते. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील सुद्धा तिथे होते. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली होती. (Mahavikas Aghadi Vs BJP)

किरीट सोम्मय्या कॅमेरा आत घेऊन शायनिंग मारत होते का?

महिर कोटेचा आणि संजय दिना पाटील यांच्यात घटनास्थळी शाब्दिक चकमक झाली होती. दोघेही उत्तर-पूर्व लोकसभा म्हणजेच ईशान्य मुंबईत निवडणूक लढवत आहेत. किरीट सोम्मय्या कॅमेरा आत घेऊन शायनिंग मारत होते का? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. (Mahavikas Aghadi Vs BJP)

महाविकास आघाडीचे नेते संजय दीना पाटील हे किरीट सोमय्यांवर आक्रमक होताना दिसले आहेत. भाजप नेते बचाव कार्यात अडथळा आणत आहेत. सोमय्यांमुळे बचाव कार्य काही काळ थांबवण्यात आलं होतं, अशा आरोप संजय दीना पाटील यांनी केला होता. (Mahavikas Aghadi Vs BJP)

ते खोटं बोलत आहेत. खोटं बोलणं हे त्यांचं काम आहे. ते का आत गेले? प्रशासनाच्या कामात अडथळे आणतात, असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला. कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले होते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच लोकांनी देखील नेत्यांना सुनावलं. ‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच, असं काहींनी म्हटलंय.

News Title – Mahavikas Aghadi Vs BJP Fight At Ghatkopar petrol pump Hording Collapse

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांनो तयारीला लागा; राज्यात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार

आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून आजचे दर

महाराष्ट्रात पुन्हा पाय पसरतोय कोरोना, पुणेकरांसाठी धोक्याची घंटा

बाईक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक लाँच

…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली ठाकरेंची इज्जत

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .