बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस स्वबळाची भाषा करत असेल, तर दुसऱ्यांनी पोटात दुखवून घेण्याचं काय कारण”

नवी दिल्ली | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. जेव्हापासून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच यावर भाजप पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडीचा जन्मच मुहर्तावर झालेला नाही, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. रावसाहेब दानवे यांनी काल पीकविम्याची मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी ज्या दिवशी निर्माण झाली तेव्हापासून त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे वाद अगदी सुरुवातीपासूनच आहेत. कधी वादळ येतं, कधी ते शमवलं जातं. पण पुन्हा वादळ येतंच, असं त्यांनी म्हटलं आहे. जरी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला असला तर, त्यांनी देशात काँग्रेसची सरकारं किती याचा काँग्रेसवाल्यांनी विचार करायला हवा, असं म्हणत दानवेंनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

काँग्रेसने स्वबळाची भाषा करणं स्वाभाविक आहे. कारण ते सरकार एकत्र चालवतात. त्यांनी पक्ष एकमेकांमध्ये विलीन केलेले नाहीत. ते सरकार एकत्र चालवतात, पक्ष मात्र वेगळे चालवतात. मग जर तसं असेल तर त्यांना आपापले पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग आता येणाऱ्या निवडणुका एकत्र लढायच्या का स्वबळावर लढायच्या हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.त्यामुळे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असेल, तर दुसऱ्यांनी पोटात दुखवून घेण्याचं काय कारण आहे?, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन!

‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?’; न्यायालयाने उर्जामंत्र्यांकडे मागितलं उत्तर

“एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

पुण्यातच तयार होतेय ‘भारतातली पहिली mRNA’ कोरोना लस; वाचा संपुर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More