Top News राजकारण

“मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार हे ठरलंय”

मुंबई | मुंबई महापालिकेची निवडणूकीसंदर्भात राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलंय. मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असं ठरलं असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलंय.

“महविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन कामं करावी असा प्रयत्न आहे”, असं नवाब मलिक म्हणालेत.

ते पुढे म्हणाले, “एकत्र लढण्याची आमची भूमिका असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ते स्पष्ट केलंय. काही लोकांचं वैयक्तिक मत वेगळे असू शकतं.”

“काँग्रेसची याबाबत अजूनही अधिकृत भूमिका अजून जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीने मुंबई महापालिका निवडणुकीबाबतचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरवलेला नाहीये. आणि याबाबत कोणतीही बैठक झालेली नसल्याचं,” मलिक यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘निट काढलास ना रे फोटो’; सहा वर्षाच्या रुद्रने केलं पाटलांचं खास फोटोशुट

…अन् कोरोनाच्या लसीकरणानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली; पाहा व्हिडीयो

कोहलीला रनआऊट करण्यावरून शोएब अख्तरची अजिंक्य रहाणेवर टीका; म्हणाला…

संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; म्हणाले…

सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात उपचार सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या