बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल”

पुणे | गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सत्ता वाटपाच्या कार्यक्रमावरून देखील अस्पष्टता असल्याचं दिसून येतंय. तर विधानसभेच्या अध्यपदावरून सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

येत्या काही काळात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये खासदार संजय राऊत यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांच्या निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. तर त्यांनी महाविकास आघाडीच्या आघाडीवर देखील सुचक वक्तव्य केलं आहे.

पिंपरी -महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना तयारी करत आहे. शहर भयमुक्‍त आणि भ्रष्टाचारमुक्‍त करण्याचे मुद्दे हाती घेऊन निवडणूक लढणार आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेचे पिंपरी चिंचवडमध्ये किमान 50 नगरसेवक निवडून आणायचे हे पक्षाचं उद्दीष्ट आहे. 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही? असा सवाल करत राऊतांनी विरोधकांना टोले लगावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्र्यांना तीन पत्र लिहली, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

‘…तोपर्यंतच आम्ही विरोधात बसणार आहोत’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचं सावट; वनडे आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल

“कोरोनापासून कधीच सुटका होणार नाही, तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही”

देशात ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची वेळ आली- दिल्ली उच्च न्यायालय

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More