बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ अधिक गतिमान होणार- अशोक चव्हाण

मुंबई | विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

ज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देऊन राज्य सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला तर भाजपचा सपशेल पराभव केला, असं अशोक चव्हाण म्हणाले.

कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण 24 जिल्ह्यात थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. कोल्हापूर व गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसप्रमाणे आता महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ देखील सुसाट होईल, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीला दुप्पट मते मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडी समोर आहे. या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; या काँग्रेस नेत्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा

“महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केलीये”

“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”

अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More