बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

मुंबई | महाराष्ट्रात सध्या तीन महत्त्वाच्या राजकीय पक्षांचं महाविकास आघाडी सरकार हे कार्यरत आहे. त्यातच आतापर्यंत वेगवेगळे विचार आणि धोरणं असलेले पक्ष एकत्रित आल्याने या ना त्या कारणाने नेहमीच महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये कुरबूरी पाहायला मिळत आहेत. त्यातच आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे गैरहजर राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईत बैठक होणार आहे. असं असलं तरी मंत्री विजय वडेट्टीवार हे मात्र नागपूर दौैऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी उघडपणे दिसून येत आहे. ओबीसी समाजाला निधी दिला जात नाही, असा आरोप सध्या केला जात असून यामुळेच वडेट्टीवार मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारणार असल्याचं समजतंय.

विजय वडेट्टीवार यांच्या खात्याला स्वतंत्र कार्यालय नाही तसेच त्यांनी केलेल्या ओबीसी समाजाच्या वसतीगृहाची मागणीही भिजत पडली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. तसेच यापुर्वीही विजय वडेट्टीवार हे मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा ते गैरहजर राहणार असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

वडेट्टीवार हे ओबीसी समाजाचं नेतृ्त्व करतात, समाजासाठी निधी मिळत नसताना त्यांची ही खदखद आता समोर येताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये वैचारीक मतभेद असताना आता पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

”जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय”

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी! शरद पवारांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक

बिअर पिणाऱ्यांनो सावधान, अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More