बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालंय”

मुंबई | राज्य सरकारने पावसाळी आधिवेशन 14 दिवसांचं न ठेवता, केवळ 5 आणि 6 जूलै असं दोन दिवसंच ठेवणार असल्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे. यांच्या पाठोपाठ आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतं नाहीतर त्यांचं डोकं दुखतं. तसं काहीसं मविआ सरकारचं झालं आहे. लोकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे त्यांना अधिवेशनच नकोय, असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे. राज्यात महत्वाचे विषय चर्चेसाठी असताना ठाकरे सरकारने केवळ 2 दिवस अधिवेशन ठेवल्यानं सर्व विरोधीपक्ष सरकरावर कडाडून टीका करताना दिसत आहे.

आरक्षण, ओबीसी आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न, आशा वर्कर,परिचारिकांचे प्रश्न असे असंख्य प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर असताना 2 दिवसीय अधिवेशन घेऊन सरकार काय साध्य करणार? असा सवाल करत या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता येत्या अधिवेशनात ठाकरे सरकारची कोंडी करण्यासाठी सर्वच विरोधीपक्षातील नेते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, मागील अधिवेशात भाजपने ठाकरे सरकारच्या दोन विकेट काढल्या होत्या. परंतू या वेळेस केवळ 2 दिवस अधिवेशन असल्यानं विरोधक सभागृहाचं कामकाज चालू देणार की नाही, हे येत्या 5 आणि 6 जूलैला स्पष्ट होणार आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली

‘सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरुये’; ओबीसी नेते आक्रमक

आज ठरणार टेस्टचा बादशाह; राखीव दिवशी सामन्याची चुरस वाढली

तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोदींचा आणखी एक मोठा निर्णय, ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More