बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पालघरमध्ये भाजपला मोठा धक्का; महाविकासआघाडीने मिळवला विजय

पालघर | पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. याशिवाय नंदुरबार, नागपूर, वाशिम येथेही महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे.

पालघरमध्ये आज जिल्हा परिषद आणि त्यां अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली. या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तसेच ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी झाली होती.

जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 57 पैकी शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 10, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6, बहुजन विकास आघाडी 4, अपक्ष 3 तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानवं लागलं आहे.

दरम्यान, 57 जागांपैकी बहुमतासाठी 29 जागांची गरज असली तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना आमदार तानाजी सावंतांचं बंड; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी घरोबा

भाजप आणि मनसेचं मनोमिलन होणार? राज ठाकरेंचा एकमेव आमदार म्हणतो…

राज-देवेंद्र भेटीचा सुधीर मुनगंटीवार यांनी केला मोठा खुलासा!

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More