तिकीट न मिळाल्याने नाराजी, मुंबईत महायुतीच्या तीन जागांवर बंडखोरी

Mahayuti Crises

Mahayuti | महायुतीमध्ये उमेदवारीचं तिकीट न मिळाल्याने नाराजी वाढतच चालल्याचं चित्र दिसून येतंय. अनेक ठिकाणी बंडखोरी पुकारत इच्छुक नेत्यांनी अपक्ष अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आता मुंबईमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. येथे तब्बल तीन ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेकडून बंडखोरी करण्यात आली आहे. भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी पुकारली आहे. (Mahayuti)

गोपाळ शेट्टी हे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून (Borivali Vidhan Sabha) लढण्यासाठी आग्रही होते. मात्र, येथे भाजपने धक्कातंत्रचा वापर करत संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे गोपाळ शेट्टी हे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय.

बोरिवलीसह ‘या’ मतदारसंघात बंड

आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तर, मुंबादेवी मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. येथे भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी रात्रीच झटपट शिवसेनेत प्रवेश करून आपल्या तिकीटासाठी खेळी खेळली. शायना एन. सी या आता शिंदे गटाकडून लढणार आहेत.

मात्र, यामुळे भाजप नेते अतुल शाह नाराज झाले आहेत. त्यांनी बंडखोरी पुकारत उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय. आज ते आपला अर्ज भरणार आहेत. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप अपयशी ठरला आहे.याचा परिणाम आता महायुतीवर होणार असल्याचं चित्र आहे. (Mahayuti)

यासोबतच वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी झाली आहे.वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी येथे बंडखोरी पुकारली आहे. ते आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (Mahayuti)

भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी

म्हणजेच मुंबईत तीन ठिकाणी भाजप आणि शिंदे सेनाकडून बंडाळी पुकारण्यात आली आहे. बंडखोरीचं हे चित्र इतर मतदारसंघात देखील दिसून येतंय. काही नेते तर महायुतीत असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे आमदार महेश लांडगेंना पुन्हा एकदा संधी दिल्याने विलास लांडे हे नाराज झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार विलास लांडे यांनी थेट शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय. अशा बंडखोरीमुळे महायुतीला निवडणूक लढणे कठीण जाणार असल्याचं चित्र दिसून येतंय. (Mahayuti)

News Title –  Mahayuti BJP-Shiv Sena rebellion in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या-

आत्महत्येची भाषा करणारे आमदार वनगा कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन

मनसेची सातवी यादी जाहीर, पारनेरमध्ये लंकेंविरोधातही दिला उमेदवार

अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, महायुतीत NCP ला किती जागा मिळाल्या?

आज धनत्रयोदशी, देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन-सुखाचा वर्षाव!

‘या’ बड्या नेत्याच्या उपस्थितीत निलंगेकर उमेदवारी अर्ज भरणार

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .