कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट?, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली

Mahayuti Cabinet expansion date 

Mahayuti Cabinet expansion | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दिल्लीत काल (11 डिसेंबर) महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली असल्याचं म्हटलं जातंय. (Mahayuti Cabinet expansion)

येत्या 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अधिकृत कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. काल, दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्रिपदांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज फडणवीस, शिंदे आणि अजित पवार मुंबईकडे रवाना होतील.

मिळालेल्या माहितीनुसार, यात भाजपचे 20 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून 5 नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, असं बोललं जातंय.तसेच, शिंदे गटाकडून 2 मंत्र्‍यांचा पत्ता कट होणार असल्याची देखील सध्या चर्चा सुरू आहे. तर 5 नवीन आमदारांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे.

शिंदे गटाचे संभाव्य मंत्री-

१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दिपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक (Mahayuti Cabinet expansion)
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे
१२) प्रकाश सुर्वे
१३) आशिष जैस्वाल

News Title –  Mahayuti Cabinet expansion date 

महत्वाच्या बातम्या-

महालक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 5 राशींचे येणार सोन्याचे दिवस, सर्व मनोकामना पूर्ण होणार!

सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची दिली सुपारी

धक्कादायक! पत्नीच्या छळाला कंटाळून २४ पानांचे पत्र लिहीत AI इंजिनिअरने संपवलं जिवन

पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; काय आहे कारण?

BJP आमदाराच्या मामाच्या हत्ये संदर्भात धक्कादायक माहिती समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .