पडळकर ते राणे, मंत्रीमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?; वाचा संपूर्ण यादी

Maharashtra

Mahayuti Cabinet Minister List | महायुतीला विधानसभेत यश मिळाल्यानंतर नव्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज यासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. आज एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहितीही समोर आली आहे. यानंतर नवे मुख्यमंत्री कोण होणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. त्याचबरोबर मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालं असून सध्या काही नावांची चर्चा आहे,मात्र त्यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालं नाही. (Mahayuti Cabinet Minister List )

दुसरीकडे, मुख्यमंत्रीपद आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी भाजपा आणि शिंदे गट आग्रही आहे. भाजपला युतीमध्ये सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे. तर, किमान अडीच वर्षे तरी शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी भूमिका शिवेसना पक्षातील नेत्यांची आहे. आज अमित शाह यांच्यासोबत प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.या बैठकीतच मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे.

राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला दिसणार असल्याचं म्हटलं जातंय. याशिवाय नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समसमान मंत्रिपदं देण्यात येतील, अशी माहितीही समोर येत आहे.

मंत्रीपदासाठी भाजपकडून ‘ही’ नावे चर्चेत

राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड अशा 11 जणांची नावं सध्या समोर आली आहेत. (Mahayuti Cabinet Minister List )

शिंदे गटाकडून कुणाची चर्चा?

शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या 11 जणांच्या नावाची चर्चा आहे.

अजित पवार गटाकडून कोण चर्चेत?

राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या 13 जणांची चर्चा आहे. (Mahayuti Cabinet Minister List )

News Title –  Mahayuti Cabinet Minister List

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार; कोण होणार पुढील CM?

आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!

अभिषेक बच्चनकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाला,”मला माहित होतं की ऐश्वर्या…”

“मला त्याच्यासोबत झोपायला…”, सई ताम्हणकरच्या खुलाशाने खळबळ

‘हे’ 20 मंत्री घेणार शपथ?, सर्वात मोठी अपडेट समोर

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .