Mahayuti Cabinet | विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुती उद्या 5 डिसेंबर रोजी सरकार स्थापन करणार आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबतचा निर्णय लागणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार असून या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते पद, मुख्यमंत्रीपद तसेच इतर मंत्री पदांबाबत चर्चा होईल. (Mahayuti Cabinet)
शपथविधीसाठी आता आजचा दिवस शिल्लक असताना मंत्रीपदाचा फॉर्म्युला हा समोर आला आहे. शिंदे सरकारमध्ये भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे 10 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री होते. आता यंदाच्या महायुती सरकारमधील खातेवाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय.
महायुतीत कुणाला लागणार मंत्रीपदाची लॉटरी?
यात भाजपाला सर्वाधिक 20 मंत्री पद, शिवसेना शिंदे गटाला 12 तर अजित पवार गटाला 9 मंत्रीपद मिळतील, अशी माहिती आहे. भाजपाला विधानसभेत तब्बल 132 जागांवर यश मिळालय. त्यामुळे सर्वाधिक मंत्रीपदे ही भाजपच्याच वाट्याला जाणार हे अगोदरपासूनच बोललं जात होतं.
शिवसेना शिंदे गटाने या विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 13 ते 16 मंत्रिपदांची मागणी केली. यापैकी 13 मंत्रिपद मिळणार असल्याचं समोर आलंय. त्यापैकी 7 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्रिपदं असणार असल्याची माहिती आहे.(Mahayuti Cabinet)
आझाद मैदानावर पार पडणार शपथविधी सोहळा
दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानेही 41 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय. अजित पवारांनी भाजपला पाच आमदारांमागे एक मंत्रिपद मागितलं आहे. त्यानुसार त्यांना 5 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच या महायुती सरकारमध्ये एकूण 43 मंत्रिपद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आलाय. येथे जवळपास अडीच हजार हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर सशस्र पोलीस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. (Mahayuti Cabinet)
News Title – Mahayuti Cabinet Ministers list in front
महत्त्वाच्या बातम्या :
बळीराजाची चिंता वाढली, IMD चा राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!
दिल्लीत दोन दिवसांपासून अजित पवार वेटिंगवर; अमित शाहांकडे ‘या’ मागण्या करणार?
आज देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार!
“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व…”, सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत
पहिल्या टर्मला आमदारकी अन् दुसऱ्या टर्मला थेट मंत्रिपद, अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार?