फडणविसांच्या चेहऱ्यावर फूललेलं हास्य अन् शिंदेंचा पडलेला चेहरा..’त्या’ फोटोंची जोरदार चर्चा

Mahayuti | विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सर्वांचं लक्ष आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे लागलं आहे. याचसंदर्भात काल (28 नोव्हेंबर) दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रि‍पदाबाबत देखील चर्चा झाली. (Mahayuti)

या बैठकीतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दिल्लीत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde),अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही तेथे उपस्थित होते. यांचा फोटो आता चर्चेत आला आहे. कारण, या फोटोंमध्ये अमित शाह यांच्यासह सगळे दिग्गज नेते हसताना आणि आनंदी दिसत आहेत. अपवाद आहे तो एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याचा.

‘त्या’ फोटोंची जोरदार चर्चा

फोटोमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याचं दिसून येतंय. शिवाय एकाही फोटोत ते हसले नाहीत. एकनाथ शिंदे या फोटोंध्ये उभे आहेत मात्र त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या गांभीर्याची एकच चर्चा रंगते आहे. फोटोमधील त्यांची बॉडी लँग्वेज वेगळ्याच चर्चेला वाट करून देत आहे. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचं जाहीर केलं होतं. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, काल दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचा पडलेला चेहरा काहीतरी वेगळंच सांगून जातोय. या फोटोंची आता जोरदार चर्चा रंगत आहे. (Mahayuti)

दरम्यान, दिल्लीतील  बैठकी नंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मी होतो, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सगळे होते. चर्चा सकारात्मक होती. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे. तसंच माझा चेहरा तुम्हाला गंभीर, कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात. महाराष्ट्राच्या जनतेसाठी कल्याणकारी योजना आम्ही केल्या. जनता समाधानी आहे यातच आमचं समाधान आहे.”, असंही पुढे शिंदे म्हणाले. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या महायुतीच्या या बैठकीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे चर्चेचा विषय ठरत आहेत. फडणवीस यांच्या चेहऱ्यावर फुलेललं हास्य हे मुख्यमंत्री पदाचे संकेत तर नाही?, याबाबतही आता चर्चा रंगत आहेत.  (Mahayuti)

News Title : Mahayuti chief leaders Meeting in Delhi

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी समोर! ‘या’ खात्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद?

मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, आता…

मुंबईकरांनो काळजी घ्या!, हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर

निवडणूक आयोगानं बातमी तर शेअर केली, मात्र कमेंट सेक्शन बंद करुन ठेवला!

…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत; लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट