Mahayuti Govt Cabinet | विधानसभेत महायुतीला मिळालेल्या विजयानंतर आता मंत्रीपदात कुणाची वर्णी लागणार, मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. कालच (28 नोव्हेंबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्रीमंडळाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी महायुतीच्या मंत्रीमंडळात अनेक महिला आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (Mahayuti Govt Cabinet )
भाजपला विधानसभेत सर्वाधिक 132 जागांवर यश मिळालं आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. अजित पवारांचे देखील 41 आमदार जिंकले आहेत. यात भाजपकडून यंदा विधानसभेवर 14 महिला आमदार निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनेकडून 2 आमदार विधानसभेवर निवडून आल्या आहेत. त्यातील 4 महिला आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
यामध्ये मागील 2 टर्म पेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्री मंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाकडून मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव यांनी विधानसभा जिंकली आहे. तर, राष्ट्रवादीकडून सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अणुशक्तीनगर), आदिती तटकरे (श्रीवर्धन) ही विजयी महिला आमदारांची नावे आहे. यात आदिती तटकरे यांचं नाव मंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. (Mahayuti Govt Cabinet )
भाजपच्या विजयी महिला आमदार
चिखली – श्वेता विद्याधर महाले
भोकर – श्रीजया अशोकराव चव्हाण
जिंतूर – बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
वसई – स्नेहा पंडित
कल्याण पूर्व – सुलभा गणपत गायकवाड
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – चौधरी मनिषा अशोक
पर्वती – माधुरी सतीश मिसाळ
शेगाव – मोनिका राजीव राजळे
केज – नमिता अक्षय मुंदडा
फुलंब्री – अनुराधा अतुल चव्हाण
गोरेगाव- विद्या ठाकूर
नाशिक मध्य- देवयानी फरांदे
नाशिक पश्चिम- सीमा हिरे
भाजपकडून 14 महिला या आमदार झाल्या आहेत. त्यापैकी कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी 12 खात्यांची मागणी केल्याची मागणी आहे. तर, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. (Mahayuti Govt Cabinet )
News Title : Mahayuti Govt Cabinet Women Minister list
महत्वाच्या बातम्या –
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF चे पैसे काढणं होणार सोप्पं
ठरलं! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?, तर, शिंदे-अजितदादा..
CM पदाच्या बदल्यात शिंदेंना हवीत ‘ही’ मोठी खाती?, अजितदादांच्या वाट्याला काय येणार?
फडणविसांच्या चेहऱ्यावर फूललेलं हास्य अन् शिंदेंचा पडलेला चेहरा..’त्या’ फोटोंची जोरदार चर्चा