महिलांना पार्ट टाइम जॉब, 11 हजार पगार देणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

Mahayuti Govt | राज्यात महायुती सरकारकडून ‘लाडकी बहीण योजना’ राबवली जात आहे. योजनेचे पैसे लाडक्या बहीणींच्या खात्यावर जमा देखील करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जातोय. अशात सरकारमधील एका मंत्र्याने महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. (Mahayuti Govt )

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकार आता महिलांना पार्ट टाईम 4 तासांचा जॉब देणार आहे. यासोबतच त्यांना 11 हजार पगार देखील दिला जाणार आहे. या नव्या घोषणेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत पाटील यांची घोषणा

या माध्यमातून सरकार महिलांना थेट टाटा कंपनीत जॉब देणार आहे. तसेच महिलांना एकवेळचं जेवण आणि नाष्टा देखील दिला जाणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून 1 हजार माता-भगिनींना 11 हजार मासिक वेतन मिळेल, अशी नोकरी देणार, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरवर्षी 1 लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणार, अशी पहिली घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तर, 11 हजार मासिक वेतन असणारी नोकरी देणार अशी दुसरी घोषणा त्यांनी महिलांसाठी केली आहे. या दोन घोषणा त्यांनी केल्या. (Mahayuti Govt )

“महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब तयार झाले तर घराची जबाबदारी आणि कॉलेजची जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 10-11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देतील. महिलांना मुलं, पती, सासू-सासरे आणि स्वत:ची कामे करायची आहेत. दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ती अशा परिस्थितीत असते की, सांगा आता काय करायचं आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

टाटा कंपनीत महिलांना नोकरी देणार

“मी महिनाभर खूप इंडस्ट्रीजसोबत बोललो. एका इंडस्ट्रीने मला प्रतिसाद दिला. 1 हजार जॉब ते पार्ट टाईम निर्माण करणार आहेत. उद्या त्या जॉबचे प्रातिनिधिकपणे दोन जणांना अपॉईंटमेंट लेटर देणार आहोत. त्यानंतर जाहीरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील. 11 हजार रुपये पगार आणि दोन्ही वेळेला जाणं-येणं फ्री. ते इंडस्ट्रीत येणार आहेत. एकवेळचा नाष्टा आणि एकवेळचं जेवण फ्री, असा कमालीचा इंडस्ट्रिलिस्ट सापडला. मी या निमित्ताने त्यांचं नाव सांगेन. दुर्दैवाने नुकतंच त्यांचं निधन झालं. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना 11 हजार रुपये मासिक वेतन असणारी थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, पुण्याच्या कोथरूडमध्ये 7 हजार पेक्षा अधिक मुलींचे महाकन्या पूजन संपन्न झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कन्या पूजन पार पडले.याच कार्यक्रमात त्यांनी या दोन घोषणा केल्या. (Mahayuti Govt )

News Title :  Mahayuti Govt chandrakant patil two big announcement 

महत्वाच्या बातम्या –

दसऱ्याला ‘या’ राशींवर होणार धन-सुखाची बरसात, मिळणार अमाप पैसा!

लाडक्या बहीण योजनेत मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

नवीन अपडेट्ससह KTM बाईक लाँच; जाणून घ्या किंमत

रतन टाटा यांचा वारसदार ठरला! ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील तीन संशयित ताब्यात