सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला, मुख्यमंत्र्यांसह ‘या’ 20 जणांचा होणार शपथविधी?

Mahayuti Govt | महायुती सरकारचा सत्तास्थापनेचा शुभ मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या 5 डिसेंबररोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जातंय. आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होईल असं कळतंय. यामध्ये मुख्यमंत्री पदासह किमान 20 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर याबाबत जोरदार चर्चा रंगत आहेत.तसेच, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार, याबाबतही जोरदार चर्चा आहेत. (Mahayuti Govt)

एकनाथ शिंदे यांनी भाजपाला गृहखातं मागितलं आहे. तर, नगरविकास खातं सोडण्यास शिंदे गट तयार आहे. मात्र, भाजपा एकनाथ शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नाही. भाजपाने उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रीपद मिळणार, अशा दोन ऑफर्स शिंदे यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे.

‘या’ तारखेला होणार शपथविधी?

दुसरीकडे, अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ खातं देण्यावर एकमत झाल्याचं समजतंय. त्याचबरोबर केंद्रात राष्ट्रवादीलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. आता यात भाजपाकडे कोणती खाती जाणार, याबाबत उत्सुकता होती. देवेंद्र फडणवीस स्वतःकडे गृहखातं ठेवणार असल्याची माहिती आहे. (Mahayuti Govt)

याशिवाय सामान्य प्रशासन, महसूल, ऊर्जा खातं, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वनखातं, ओबीसी मंत्रालय, पर्यटन खातं भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. तर, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग मंत्रालय, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, शिक्षण, सांस्कृतिक विभाग ही खाती शिंदे गटाकडे जातील, अशी शक्यता आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

दरम्यान, दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत काल महायुतीची बैठक होणार होती. पण, ही बैठक टाळून शिवसेना नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. नेहमी गावी आल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधणारे शिंदे यावेळी शांत दिसून आले. त्यांनी कोणताच संवाद न साधल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

शिंदे आपल्या गावी गेल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. “आरामात, विचार करून मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ते दरे गावात जातात. उद्या (30 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत मोठा निर्णय नक्कीच घेतील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या हालचालींबाबत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील”, असं सूचक वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे काय मोठी भूमिका घेणार, याबाबत बोललं जातंय. (Mahayuti Govt)

News Title : Mahayuti Govt CM Oath Ceremony 

महत्वाच्या बातम्या –

आज शनिदेव ‘या’ राशींवर ठेवणार कृपाछत्र!

“बीचवर 70 लोकांसमोर…”, ‘या’ अभिनेत्रीच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं!

बारावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? दीपक केसरकरांनी तारीख सांगितली

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे? अशाप्रकारे करा नोंदणी