RSS कडूनही ग्रीन सिग्नल, महायुतीत देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री?

Mahayuti Govt CM post 

Mahayuti Govt | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. अशात महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागली आहे. निकाल लागल्यानंतर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा दर्शवली होती. त्यातच आरएसएसनेही फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे. (Mahayuti Govt)

राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाकडूनही याला पसंती मिळाल्याची माहिती आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मोठ्या पाठिंब्यासोबतच फडणवीस यांच्या नावाला महायुतीतूनही पाठिंबा मिळत असल्याचं म्हटलं जातंय. असं झाल्यास एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला पुन्हा एकदा चालणार काय?, याबाबत चर्चा रंगत आहेत.

आरएसएसकडून फडणवीस यांच्या नावाला पसंती?

संघामधील कोणत्याही बड्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं नसलं तरी काही मीडिया रिपोर्टमध्ये संघाने फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून ग्रीन साइन दिल्याचे म्हटले आहे. भाजपच्या विजयामध्ये संघाचीही मोठी भूमिका राहिली आहे. त्यामुळे संघाचे मत महत्वाचे ठरले जाऊ शकते. फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक आहेत.

देवेंद्र फडणवीस अनेकदा संघाच्या कार्यक्रमांमध्ये उघडपणे सहभागी होतात. विजयादशमीच्या संघाच्या उत्सवात ते संघाच्या पूर्ण गणवेशात सहभागी होतात. लोकसभेत संघाला दूर ठेवल्याने त्याचा फटका भाजपला बसला होता. मात्र, या विधानसभेत भाजपने ही चूक सुधारली. (Mahayuti Govt)

अजितदादा-शिंदे यांचं काय?

विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ परिवारातील सर्व संघटनांनी भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले. या काळात देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रमुख पातळ्यांवर संघाच्या थेट संपर्कात होते. संघ स्वयंसेवकांनी राज्यातील काना-कोपर्‍यात बैठकांवर जोर दिला. नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्र हित, हिंदुत्व, सुशासन, विकास, लोक कल्याण आणि एकसंघ समाज या मुद्द्यावर त्यांनी अधिक जोर देत जनतेचा विश्वास प्राप्त केला. त्यामुळे भाजपला यशाचे शिखर गाठता आले, असं राजकारणात म्हटलं जातंय.

भाजपला विधानसभेत तब्बल 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच व्हावा, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली जात आहे. आता याला आरएसएसनेही पाठिंबा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Mahayuti Govt)

News Title –  Mahayuti Govt CM post 

महत्त्वाच्या बातम्या-

आज सोमवारी ‘या’ तीन राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा!

‘महाराष्ट्र हरलास तू…’, तेजस्विनी पंडीतने राज ठाकरेंसाठी केलेली ‘ती’ पोस्ट तूफान व्हायरल!

अजित पवारांना मिळालेल्या यशामागचं कारण शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…

पराभवानंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘मी आता काय…’

“आयुष्यात छान गोष्ट घडली…”, प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत दिली गूड न्यूज

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .